सगट भजन करूं येतें । तरी मूर्खपण आंगी लागते । गाढवासी पूजितां कळतें । काये त्याला ।।

।। दास-वाणी ।। 

सगट भजन करूं येतें । 
तरी मूर्खपण आंगी लागते । 
गाढवासी पूजितां कळतें । 
काये त्याला ।। 

पूज्य पूजेसी अधिकार । 
उगेचि तोषवावे इतर । 
दुखऊं नये कोणाचे अंतर । 
म्हणिजे बरें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०४/३७-३८ 

योग्य अयोग्याचा काहीच विचार न करता 
सरसकट सगळयांचेच भजन पूजन केले,
तर आपण मूर्ख ठरू शकतो.
आता गाढवाची पूजा केली तर 
त्याला ते समजते तरी का ? 

खरोखरच पूजनीय असे फार थोडे अधिकारी पुरूष असतात.
आपण अशा पूज्य व्यक्तींचीच मनोभावे पूजा करावी.
इतर सर्व दिखाऊ गुरूंना व्यवहारापुरते पुजून 
संतुष्ट ठेवावे. त्यांना भक्तिभावापेक्षा दिखाऊ डामडौल 
जास्त रूचतो हे खरच.
दुर्लभ असा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपण किमान 
आपल्याकडून कोणासही
दुखवू नये इतकेच पथ्य पाळावे.
ही सुद्धा एक प्रकारची पूजाच मानावी.

देहदुर्लभनिरूपण समास.

No comments:

Post a Comment

SPREAD WELLNESS SPREAD AYURVEDA
Link copied! Ready to paste on Instagram.

Popular Posts

Library Index

Initializing...

    Mapping your wellness journey...

    Blog Archive

    🌿 AYURVEDA INTELLIGENCE

    Ayurveda Global Insights & Research

    Analyzing latest trends...

    Join the Initiative

    Get weekly Ayurvedic research in your inbox.

    Locate Ayurveda Initiative Near You



    Get Directions

    Total Pageviews