Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

शुध सोनें पाहोन घ्यावे । कसी लाउनी तावावें । श्रवणमनने जाणावें । प्रत्ययासी ।।

।। दास-वाणी ।। 

शुध सोनें पाहोन घ्यावे । 
कसी लाउनी तावावें । 
श्रवणमनने जाणावें । 
प्रत्ययासी ।। 

वैद्याची प्रचित येना । 
वेथा परती होयेना । 
आणि रागेजावें जना । 
कोण्या हिशेबें ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०५/१४-१५ 

चोख सोने निवडून पाहूनच घ्यावे.
ते मुशीतून काढून कासवटीला लावून
तावून सुलाखून शुद्धतेची खात्री पटवूनच
खरेदी करावे.
त्याच प्रमाणे केलेले प्रत्येक श्रवण आणि मनन
साधकाने ते प्रत्ययाच्या म्हणजेच अनुभवाच्या
कसोटीवरच ताडून घ्यावे.
अन्यथा केलेले श्रम आणि दवडलेला वेळ 
कारणी लागतच नाहीत.

कित्येक काळ उपचार सुरू आहेत.
औषधाचा अजिबात गुण येत नाहीये.
रोग बरा न होता बळावतच चाललाय.
अशा स्थितीमधे रोग्याने जर तक्रार केली तर
ती रास्तच मानली पाहिजे.
अशा वेळी वैद्यच जर उलटा डाफरायला लागला 
तर कसे व्हायचे ? 

व्यवहारामधे औषधाची प्रचिती आल्याशिवाय
स्वास्थ्य नाही.
तर परमार्थामधे साधनेची प्रचिती आल्याशिवाय
मोक्ष नाही हेच खरे.

करंटपरीक्षानिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp