Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

सकळकर्ता तो ईश्वरू । तेणें केला अंगिकारू । तया पुरूषाचा विचारू । विरूळा जाणे ।।

।। दास-वाणी ।। 

सकळकर्ता तो ईश्वरू । 
तेणें केला अंगिकारू । 
तया पुरूषाचा विचारू । 
विरूळा जाणे ।। 

येश कीर्ति प्रताप महिमा । 
उत्तम गुणांसी नाहीं सीमा । 
नाही दुसरी उपमा । 
देणे ईश्वराचे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०६/१३-१६ 

सर्व सृष्टीचा निर्माता चालक मालक पालक 
तो एकमेव ईश्वरच आहे.
श्रेष्ठतम ईश्वरानेच ज्याला आपला मानलय 
त्याच्या कार्याला मर्यादा असतील काय ?
अशा उत्तमपुरूषाला सर्वांगीण जाणून घेणारा
सुद्धा विरळाच.

हा उत्तमपुरूष यशाची उत्तुंग शिखरे लीलया
पादाक्रांत करतो.
त्याच्या पराक्रमाची कीर्ती आसमंतात दुमदुमते.
उत्तमोत्तम गुण अंगी बाणल्यामुळे त्याचे
माहात्म्य सदैव विस्तारतच जाते.

शिवरायाचे आठवावे रूप ।
शिवरायाचा आठवावा प्रताप ।।

यश श्री औदार्य इत्यादी ईश्वराचेच गुण घेऊन 
जन्माला आलेला हा उत्तमपुरूष म्हणजे
समाजासाठी ईश्वरी देणेच मानावा.

उत्तमपुरूषलक्षण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp