Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

मग विचारिती अंत:कर्णी । जेथे तेथें धोंडा पाणी । उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ।।

।। दास-वाणी ।। 

मग विचारिती अंत:कर्णी । 
जेथे तेथें धोंडा पाणी । 
उगेंचि वणवण हिंडोनि । 
काये होतें ।। 

ऐसा ज्यासी विचार कळला । 
तेणें सत्संग धरिला । 
सत्संगें देव सापडला । 
बहुत जनासी ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०८/१२-१३ 

देवाच्या भेटीसाठी धावधावून तीर्थयात्रा अखंड
करत राहातात. आत्मिक समाधान काही
लाभत नाही. मनात वाटते जाऊ तिथे नदी, तलाव,
भव्य मंदिरे आणि पाषाणाच्या मूर्तीच की.
‌एवढे वणवण फिरून उपयोग काय ? 

सगुणाच्या आधारे पुढे कसे जायचे हेच कळत नाही.
काही भक्त लोक मग संतांना शरण जातात.
त्यांच्या सतत सहवासात राहून राहून निर्गुणाची
उपासना कळते. दीर्घकाऴ सुरू राहाते.
संतसंगतीनेच मग हळूहळू आत्मदेवाची अनुभूती
येऊ लागते. हाच खरा देव. 
इथे घाई करून चालत नाही.
पूर्वसुकृत आणि दीर्घकाळ उपासनाच 
अपेक्षित फळ देतात.
तुका म्हणे येथे, नाही चालत तातडी । 
प्राप्त कालघडी आल्यावीण ।। 
हेच खरे ! 

अंतर्देवनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp