Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

लिहिणे नाही वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणे नाहीं । नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ।।


।। दास-वाणी ।। 

लिहिणे नाही वाचणें नाहीं । 
पुसणें नाहीं सांगणे नाहीं । 
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । 
बाष्कळपणें ।। 

अंतरी येक बाहेर येक । 
ऐसा जयाचा विवेक । 
परलोकाचें सार्थक । 
कैसें घडे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०३/०८-१० 

लिहायची आवड नाही.
वाचायची सवयच नाही.
आपले काही अडतय हेच कळत नाही.
त्यामुळे कोणाला काही विचारायची गरज भासत नाही.
स्वत: अज्ञानी असल्याने इतरांना सांगण्यासारखे
याच्याकडे काही नसतेच.
नेमस्त नियमीतपणा अंगी कधीच बाणला नाही,
मग बाष्कळ बडबड आणि उथळ वागणूक 
यातच आयुष्य निघून जाते.

अशा व्यक्तींची अस्थिर मनोवृत्ती त्यांना 
आत एक विचार आणि बाहेर वर्तणूक भलतीच 
असे वागायला भाग पाडते.
इतक्या अविवेकी व्यक्तीला साधा व्यवहार सुद्धा 
नीट जमत नाही.
परमार्थ आणि मोक्ष तर फार दूरच्या गोष्टी राहिल्या.
यावर मार्ग एकच.नि:स्वार्थ होऊन विवेकाची
कास धरावी.

निस्पृहशिकवण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp