Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

नाना देव होऊन बैसला । नाना शक्तीरूपें जाला । भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ।।

।। दास-वाणी ।। 

नाना देव होऊन बैसला । 
नाना शक्तीरूपें जाला । 
भोक्ता सकळ वैभवाला । 
तोचि येक ।। 

याचा पाहावा विचार । 
उदंड लांबला जोजार । 
होती जाती देव नर । 
किती म्हणोनि ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १८/०१/१७-१८ 

सर्व देवतांचे मूळ असलेला हा अंतरात्मा किंवा
ईश्वर अनेक रूपांत प्रगटलाय.
देवी देवतांच्या अवतारांमधे वेगवेगळया शक्ती
धारण करून तो व्यक्त होतो.
सर्व प्रकारचे वैभव तो ईश्वरच निर्माण करतो आणि भोगतोही.

नीट विचार केला तर देवदेवता आणि नरदेवांची यादी
कधी संपणारच नाही.
त्रिगुणात्मक असल्याने मानवासकट ईश्वरी 
अवतारांनाही येणे जाणे आहेच.
मानवी अवतारामधील ईश्वराला देखील 
देहाचे सर्व चांगले वाईट भोग अपरिहार्य आहेत.

बहुदेवस्थान समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp