Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

ऐसा दो दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म । नाना दु:खाचा संभ्रम । मानून घेतला ।।

।। दास-वाणी ।। 

ऐसा दो दिसांचा भ्रम । 
त्यास म्हणती परब्रह्म । 
नाना दु:खाचा संभ्रम । 
मानून घेतला ।। 

दु:खी होऊन चर्फडून गेले । 
तेथें कोण समाधान जाले । 
कांही येक सुख भोगिलें । 
तों सवेंचि दु:ख ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १७/०६/०६-०७ 

जीवात्मा देहतादात्म्यामुळे विविध प्रकारची दु:खे भोगतो.
देहाची आयुर्मर्यादा संपली की हा लग्गेच बाहेर पडतो.
मुळात जीवन इतके अल्प आणि भ्रमरूप असूनही
सर्वं खलु इदं ब्रह्म । या उक्तीनुसार लोक ते ब्रह्मरूपच
मानतात.

वास्तविक ब्रह्माच्या ठायी दु:ख असे नाहीच.
ते सर्वार्थाने निखळ आनंददायीच असते.
तरीही भौतिक सुखातच आनंद मानणारे बद्ध
जीव सुखामागून दु:ख अन् दु:खामागून सुख 
अशा हिंदोळयावर झुलत असतात.
हा आशा निराशेचा खेळ म्हणजेच आयुष्य होय,
या ठाम समजुतीने शेवटी फक्त दु:ख पदरी 
पडून तडफडून मरून जातात.
शिल्लक राहिलेले भोग भोगण्यासाठी जीवात्मा
पुन्हा वेगळया योनीतील नवीन देहामधे प्रवेश करतो.

देहात्मनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp