Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

आपले आपण अन्हित करावें । त्यास आडवें कोणे निघावें । येकांतीं जाऊन जीवें । मारी आपणासी ।।

।। दास-वाणी ।। 

आपले आपण अन्हित करावें । 
त्यास आडवें कोणे निघावें । 
येकांतीं जाऊन जीवें । 
मारी आपणासी ।। 

जो आपला आपण घातकी । 
तो आत्महत्यारा पातकी । 
याकारणें विवेकी । 
धन्य साधु ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
दासबोध : १७/०७/०९-१० 

जो स्वत:चे रक्षण स्वत: करतो तो आपला आपणच
मित्र असतो. 
याउलट जो स्वत: स्वत:चे अनहित करतो तो
स्वत:चाच शत्रू असतो.
आत्मैव ह्यात्मनो बन्धु: आत्मैव रिपु: आत्मन: । 
कोणी एकटा जर समाजापासून दूर जाऊन स्वत:ला 
मारून टाकू इच्छितो तर त्याला अडविणार तरी
कोण आणि कसे ?

कोणत्याही कारणास्तव अडाणीपणे जो आत्महत्या करतो,
तो आत्मघातकी तर असतोच परंतु पापी ही असतो.
याउलट अडचणींवर मात करून योग्य अयोग्याचा
विवेक करून धैर्याने उभा राहातो.
ईश्वराने नेमून दिलेले कार्य उत्तम पद्धतीने पेलतो.
कार्यसिद्धीही घडवून आणतो तोच साधू.
तोच पुण्यवान संत. त्याचे आयुष्यही धन्य होय.

जगज्जीवननिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp