Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)

जैसे पांचहि प्राण । कार्यभागें वेगळाले जाण । नाहीं तरी वायोचें लक्षण । येकचि असे ।।

।। दास-वाणी ।। 

जैसे पांचहि प्राण । 
कार्यभागें वेगळाले जाण । 
नाहीं तरी वायोचें लक्षण । 
येकचि असे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
   दासबोध : १७/०८/११ 

देहामधे पाच प्राण वेगवेगळया स्थानी कार्यरत असतात.
मुख्य प्राण मस्तकामधे राहातो.
पंचप्राण हे त्याचे सहकारी आहेत.
मुख आणि नासिकांपाशी प्राण असतो.
मुखी नासिकी असिजे प्राणे । 
त्यास अखंड येणे जाणे ।। 
याशिवाय गुदस्थानी अपान, 
सर्व शरीरभर व्यापून असतो तो व्यान.
कंठामधे असतो तो उदान तर 
नाभीस्थानी राहातो तो समान.
हे पंचप्राण शरीरामधे श्वासोच्छ्वास, ह्रधिराभिसरण,
पचन, बल उर्जानिर्मिती अशी विविध कार्ये अखंड
करत असतात.
हे सर्व वायूच आहेत.
थोडक्यात शरीराच्या सर्व मुख्य क्रिया या 
वायुतत्वावर अवलंबून असतात.

तत्वनिरूपण समास.
Share this article
💬 Discuss This on WhatsApp