Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

देहबुद्धिअहंकारें । निजेले घोरती घोरें । दु:खे आक्रंदती थोरें । विषयसुखाकारणे ।।

।। दास-वाणी ।। 

देहबुद्धिअहंकारें । 
निजेले घोरती घोरें । 
दु:खे आक्रंदती थोरें । 
विषयसुखाकारणे ।। 

निजेले असतां च मेले । 
पुन्हा उपजतां च निजेले । 
ऐसे आले आणी गेले । 
बहुत लोक ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०१/२३-२४ 

मी म्हणजे देह ही देहबुद्धी. हा झाला सूक्ष्म अहंकार.
मी मोठा, मी ज्ञानी, मी सुंदर, मी चतुर, मी सत्ताधीश
हे सर्व स्थूल अहंकार.
अहंकाराच्या कैफामधे झोप लागली.
गाढ निद्रेमधे घोरू सुद्धा लागले.
जागे झाल्यावर विषयसुखाच्या आठवणींनी
दु:खाने ओरडू लागले. रडू लागले.
चटक जी लागली होती ऐषारामाची.

या मोहनिद्रेमधेच कित्येक जण मेले सुद्धा.
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । 
या न्यायाने अपूऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
पुन्हा जन्माला आले.
लगेच मी आणि माझे सुरू.
अहंकार आणि ममत्वाच्या निद्राख्यानाला सुरूवात.

असे कोटयावधी बद्ध जीव पृथ्वीवर
 कित्येक वेळा आले आणि गेले सुद्धा. 
साधना तसेच पारमार्थिक उन्नती शून्य.
मग पैलतीर किॆवा मोक्ष फारच दूर राहिला.

मंगलाचरण समास.
💬 Discuss This on WhatsApp