Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

जे या जनासि चोरले । मनास न वचे अनुमानलें । तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ।।

।। दास-वाणी ।। 

जे या जनासि चोरले । 
मनास न वचे अनुमानलें । 
तेंचि जेणें दृढ केलें । 
या नांव साधक ।। 

जें बोलतांचि वाचा धरी । 
जें पाहतांचि अंध करी । 
तें साधी नाना परी । 
या नाव साधक ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०५/०९/१७-१८ 

सामान्य जनांपासून जे सदैव गुप्त राहिलय.
मन बुद्धी चित्ताच्या सहाय्याने देखील 
ज्याचा ठाव लागत नाही ते आत्मस्वरूप
 हेच आपले खरे रूप आहे असा निश्चय ज्याने
आपल्या मनाशी दृढ केलाय तो साधक म्हणावा.

पश्चात्तापदग्ध मुमुक्षु साधनामार्गावर दाखल 
होतो तो साधक म्हणूनच.

ज्या परब्रह्माविषयी बोलू लागले तर वाणी विराम घेते.
त्याला पाहू गेले तर दृष्टीसमोर अंध:कार पसरतो.
चर्मचक्षूंनी जे दिसतच नाही.
असे आत्मस्वरूप ज्ञानचक्षुंच्या सहाय्याने 
पाहण्याचा आटोकाट प्रामाणिक प्रयत्न करतो.
तो साधक.
सिद्धावस्थेच्या अलिकडील टप्पा.

साधकलक्षण समास.
💬 Discuss This on WhatsApp