Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यरासी । म्हणौन वेदीं सामर्थ्यासी । काय उणे ।।

।। दास-वाणी ।। 

वेदाक्षर घडे ज्यासी । 
तो बोलिजे पुण्यरासी । 
म्हणौन वेदीं सामर्थ्यासी । 
काय उणे ।। 

वेदशास्त्रपुराण । 
भाग्यें जालियां श्रवण । 
तेणें होईजे पावन । 
हें बोलती साधु ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०६/३०-३१ 

पूर्वसुकृताने वेदांचा अभ्यास ज्याला घडतो 
तो पुण्याच्या राशीच्या राशी जोडतो.
वेदांमधील एक अक्षर जरी कानावर पडले,
तरी मोठेच पुण्य मिळते.
ही वेदांची ताकद आहे.

चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे
यांचे महद् भाग्याने जर श्रवण घडले,
तर श्रोता पावन पवित्र होऊन जातो.
असे साधुसंत सांगतात जे स्वत: 
वेदाभ्यासानेच परिपूर्ण झालेले असतात.
स्वत: मुक्ती प्राप्त असूनही ते संत बद्ध म्हणजे
बांधलेल्या जीवांना मार्गदर्शक ठरतात.

बद्धमुक्त निरूपण समास.
💬 Discuss This on WhatsApp