Skip to main content
🌿 The Science of Life — Ayur (Life) + Veda (Knowledge)
📞 💬

जयास द्वैत भासलें । ते मन उन्मन जाले । द्वैताअद्वैताचें तुटले । अनुसंधान ।।

।। दास-वाणी ।। 

जयास द्वैत भासलें । 
ते मन उन्मन जाले । 
द्वैताअद्वैताचें तुटले । 
अनुसंधान ।। 

येवं द्वैत आणि अद्वैत । 
होये वृत्तीचा संकेत । 
वृत्ती जालिया निवृत्त । 
द्वैत कैचे ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०५/१२-१३ 

अंत:करणामधे मी आणि परमेश्वर वेगवेगळे आहोत.
ही भावना म्हणजे द्वैत.
नवविधा भक्तीमधून मनाचे एकदा उन्मन झाले की
परमेश्वराशी एकरूपता साधते. हे अद्वैत.
अहं ब्रह्मास्मि ची अनुभूती द्वैत आणि अद्वैत
दोन्ही मावळून टाकते.

एकूण काय वेगळेपण आणि एकरूपता 
या दोन्ही अंत:करणवृत्तीच्या अवस्था आहेत.
कठोर प्रदीर्घ साधनेअंती ही वृत्तीच जर 
निवृत्त झाली तर द्वैताचा अनुभव
 नेमका कोण आणि कसा घेणार ?
 त्यामुळे द्वैत शिल्लकच राहणार नाही.
 उरेल ते एकमेवाद्वितीय परब्रह्म.
 म्हणजेच अद्वैत ! 

द्वैतकल्पनानिरसन समास.
💬 Discuss This on WhatsApp